खोट्या पाकिस्तानचा पुन्हा एकदा कांगावा, म्हणाले त्यांच्या चपलांमध्ये काहीतरी होते | Lokmat News

2021-09-13 0

कुलभूषण जाधव यांच्या मुलाखतीदरम्यान त्यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानने योग्य वागणूक दिली नाही तसेच जाधव यांच्या पत्नीच्या चपलाही जप्त करण्यात आल्या होत्या. या भारताच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना त्यांच्या चपलांमध्ये धातूसदृश्य काहीतरी होते, असे पाकिस्तानने सांगितले आहे.जाधव यांच्या मुलाखतीदरम्यान संपूर्ण वातावरण हे त्यांना घाबरावणारे होते. त्यांचे कपडे देखील बदलण्यात आले होते. तसेच जाधव यांच्या पत्नीच्या चपला देखील त्यांना परत देण्यात आल्या नाहीत. भारताच्या या आरोपांवर स्पष्टीकरण देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, जाधव यांच्या पत्नीच्या चपला या सुरक्षेच्या कारणास्तव जप्त करण्यात आल्या होत्या. कारण त्यामध्ये संशयास्पद धातूची वस्तू आढळून आली होती.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires